मुख्य मजकुराकडे जा
लाडकी बहीण योजनामाहिती मार्गदर्शक · खाजगी वेबसाइट

अधिकृत लिंक्स

ladakibahin.maharashtra.gov.in — अधिकृत पोर्टल आणि सर्व खऱ्या सरकारी लिंक्स

योजनेसाठी लागणारी प्रत्येक खरी सरकारी लिंक एका पानावर — ती काय करते, कधी लागते आणि तिचा नेमका पत्ता. WhatsApp वरून आलेली कोणतीही लिंक इथे पेस्ट करून तपासा.

अद्ययावत:

‘ladki bahin maharashtra gov in’ — खरा पत्ता कोणता?

Google वर बहुतेक जण ladki bahin maharashtra gov in किंवा ladkibahin.maharashtra.gov.in असे शोधतात. पण शासनाच्या पोर्टलचा पत्ता ladakibahin.maharashtra.gov.in असा आहे — ladaki मध्ये d नंतर a आहे. पत्ता स्वतः टाइप करताना हा फरक लक्षात ठेवा, आणि शोध निकालात आलेली वेबसाइट .maharashtra.gov.in ने संपते का ते पाहा — नसेल तर ती खाजगी वेबसाइट आहे (ही वेबसाइटही खाजगी आहे).

कशासाठी पान पत्ता
अर्जदार लॉगिन, स्टेटस, हप्त्यांचा इतिहास लॉगिन मार्गदर्शक ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in
ई-केवायसी (फक्त विंडो सुरू असताना) ई-केवायसी — आजची स्थिती ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
योजनेची माहिती व शासन निर्णय — ladakibahin.maharashtra.gov.in/scheme_information
आवश्यक कागदपत्रे कागदपत्रे ladakibahin.maharashtra.gov.in/required_documents

कोणतीही लिंक खरी की बनावट — इथे तपासा

ही लिंक खरी की बनावट?

WhatsApp / SMS वर आलेली कोणतीही लिंक इथे पेस्ट करा. आम्ही फक्त डोमेन तपासतो — लिंक उघडत नाही.

ही माहिती तुमच्या फोन/ब्राउझरमध्येच राहते. आम्ही काहीही साठवत नाही, कुठेही पाठवत नाही.

खरी अधिकृत डोमेन्स:
  • ladakibahin.maharashtra.gov.in
  • maharashtra.gov.in
  • mahaonline.gov.in
  • womenchild.maharashtra.gov.in
  • grievances.maharashtra.gov.in
  • uidai.gov.in
  • npci.org.in
  • pfms.nic.in
  • dbtbharat.gov.in
  • india.gov.in
  • mahafood.gov.in
  • nfsa.gov.in
  • controllerofrationing-mumbai.gov.in
  • agristack.gov.in
  • pmkisan.gov.in
  • eshram.gov.in
  • nha.gov.in

योजनेचे अधिकृत पोर्टल

पोर्टलवर चार पाने आहेत: मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉगिन. वर “हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१” दिसते. (पोर्टलवरील “त्रुटी नोंदवा” ही Google Form लिंक सप्टेंबर २०२६ मध्ये बंद आढळली — तांत्रिक अडचणींसाठी १८१ वापरा.) पोर्टल महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन चालवते (३ रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, मुंबई ४०००३२).

संबंधित सरकारी पोर्टल — कधी लागतात

शासन निर्णय (GR) व मार्गदर्शक सूचना

योजनेचे सर्व शासन निर्णय पोर्टलवर PDF स्वरूपात आहेत. निकष, वय, उत्पन्न मर्यादा यांबाबत वाद असल्यास हेच अंतिम दस्तऐवज.

हेल्पलाइन

  • 181

    महिला हेल्पलाइन (टोल फ्री) — योजनेचा अधिकृत हेल्पलाइन क्रमांक

  • 1947

    UIDAI आधार हेल्पलाइन — आधार-मोबाईल लिंक, आधार दुरुस्ती

  • 1800-11-0001

    NPCI / DBT भारत — आधार-बँक सीडिंग (DBT) चौकशी

लक्षात ठेवा

शासनाकडे ई-केवायसी किंवा हप्त्यासाठी कोणतेही ॲप नाही, कोणताही WhatsApp नंबर नाही आणि कोणीही फोन करून ओटीपी मागत नाही. हे तिन्ही दिसले की ती फसवणूक.

नेहमीचे प्रश्न

ladakibahin.maharashtra.gov.in आणि ladkibahin.maharashtra.gov.in — कोणते खरे?

खरे पोर्टल ladakibahin (l-a-d-a-k-i) असे आहे — 'ladaki' मध्ये दोन 'a'. ladkibahin.maharashtra.gov.in असा पत्ता अस्तित्वात नाही. पत्ता टाइप करताना ही चूक सर्वाधिक होते.

पोर्टलवर लॉगिन केल्यावर काय दिसते?

'Application Made Earlier' मध्ये तुमचा अर्ज आणि त्याची स्थिती (मंजूर / प्रलंबित / नामंजूर), आणि अर्जाच्या ओळीतील शेवटच्या बटणावर 'Application Transaction History' — प्रत्येक हप्त्याची तारीख, बँक, रक्कम व Paid स्थिती. लॉगिन टप्प्याटप्प्याने: या वेबसाइटवरील लॉगिन मार्गदर्शक.

योजनेचे शासन निर्णय (GR) कुठे मिळतात?

पोर्टलच्या 'योजनेची माहिती' पानावर सर्व शासन निर्णय PDF स्वरूपात आहेत. याच पानावर खाली त्यांची यादी थेट लिंकसह दिली आहे.

ही वेबसाइट (ladkibahin.com) अधिकृत आहे का?

नाही. ही खाजगी माहितीपर वेबसाइट आहे. आम्ही फक्त प्रक्रिया समजावतो; इथे कोणताही अर्ज किंवा ई-केवायसी होत नाही आणि आम्ही आधार/ओटीपी मागत नाही.

स्रोत व संदर्भ

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना — अधिकृत पोर्टल (मुखपृष्ठ व सर्व उपपाने पाहिली) (ladakibahin.maharashtra.gov.in ↗) — अधिकृत सरकारी वेबसाइट उघडेल · १६ सप्टेंबर २०२६
  2. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र (womenchild.maharashtra.gov.in ↗) — अधिकृत सरकारी वेबसाइट उघडेल · १६ सप्टेंबर २०२६